सिलेसियन खुल्या बॉक्सींग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक

पोलंड येथे सुरु असलेल्या सिलेसियन खुल्या बॉक्सींग स्पर्धेत मेरीने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मेरीने कझाकिस्तानच्या एगेरीम कासानायेवावर 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले आहे.

भारताने या स्पर्धेत एकूण मेरीने आतापर्यंत पाचवेळा जागतिक अजिंक्मयपद स्पर्धा जिंकली आहे.

या वर्षातील मेरीचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा आणि भारतीय खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. बल्गेरिया येथे झालेल्या स्पर्धेत तिने रौप्यपदकही पटकावले होते.

या स्पर्धेत भारताच्या मनीषाने 54 किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: