सिक्कीम मधील पहिले विमानतळ

पाकयाँग हे देशातील १०० वे कार्यरत विमानतळ ठरणार असून सिक्कीमधील पहिलेच विमानतळ आहे. आत्तापर्यंत विमानतळ नसणारे सिक्कीम हे देशातील एकमेव राज्य होते.

पाकयाँग हे ग्रीनफिल्ड प्रकारातील विमानतळ समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असून ते २०१ एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे.

भारत-चीन सिमारेषेपासून जवळ असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही पाकयाँग विमानतळ महत्वाचे आहे. भारत-चीन सिमेपासून अवघ्या ६० किलोमीटरवर असणाऱ्या या विमानतळाचा सुरक्षादलांनाही फायदा होईल.

सध्या भारतीय हवाईदलाकडे असणारी अनेक लडाऊ विमाने या विमानतळावर उतरवता येतील असे मत भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भारतीय हवाई दलाने याआधी सरावाअंतर्गत ड्रोनियर २२८ विमान पाकयाँग विमानतळ उतरवलेही आहे.

तसेच ईशान्य भारतातील पर्यटनासाठी आणि सिक्कीमच्या आर्थिक विकासासाठी या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे. पाकयाँग हे ग्रीनफिल्ड प्रकारातले म्हणजेच विमातळावर धावपट्टी सोडता इतर भाग गवताळ असणारे विमातळ असणार आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: