सिंधू दर्शन महोत्सव

जम्मू-काश्मीरच्या लद्दाख भागात 24 जून 2018 पासून सिंधू नदीच्या तीरावर तीन दिवसीय 22 व्या वार्षिक सिंधू दर्शन महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. सिंधू दर्शन यात्रा समिती आणि लेह लद्दाख फांडे त्सोग्स्पा संस्था यांच्या सामुदायिक सहयोगाने वरील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन RSS सरचिटणीस भैयाजी जोशी यांच्या हस्ते केले गेले.

सिंधू दर्शन महोत्सव –

1997 साली प्रथमच सिंधू दर्शन महोत्सवाचे आयोजन माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले होते.

हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सामंजस्यता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा यावर केंद्रित असतो. देशातील विविध भागाची संस्कृती वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे या ठिकाणी प्रदर्शित केली जाते.

उत्सव साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे सिंधू नदीची ओळख सांप्रदायिक सलोखा आणि भारताची एकताअशी जपणे हे आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: