साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८

साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. रत्नाकर मतकरी यांना “साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे तर “युवा साहित्य अकादमी पुरस्कार” नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.

रत्नाकर मतकरी यांचे बालसाहित्य
  • अचाटगावची अफाट मावशी
  • अलबत्या गलबत्या
  • गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)
  • चटकदार
  • चमत्कार झालाच पाहिजे
  • यक्षनंदन
  • राक्षसराज जिंदाबाद
  • शाबास लाकड्या –
  • सरदार फाकडोजी वाकडे
नवनाथ गोरे

नवनाथ गोरे हे मूळचे सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील उमदी येथील आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात संशोधक सहायक आहेत. याआधी गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्कार यासह एकूण दहा पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांनी खेड्यापाड्यातील, दुष्काळी भागाचे आणि शेतकरी वर्गाचे जीवन मांडले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय साहित्य अकादमीकडून 1954 पासून दरवर्षी २४ भाषेतील (आठव्या परिशिष्ठातील २२ भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी भाषा) उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो. यामध्ये ताम्रपत्रासह रोख रक्कम एक लाख रुपये दिली जाते. साहित्य अकादमी फेलोशिपनंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये देण्यात येणारा द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: