“सायक्लोन-30”

अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत कार्यरत कोलकाताच्या व्हेरीएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (VECC) येथे कर्करोगाच्या निदानासाठी “सायक्लोन-30” नावाची भारतातली सर्वात मोठी वैद्यकीय सायक्लोट्रॉन सुविधा कार्यरत करण्यात आली आहे.

कर्करोगाच्या निदानासाठी आणि वैद्यकीय उपचारात्मक वापरासाठी रेडियो-आयसोटोप निर्माण करण्यासाठी सायक्लोट्रॉनचा वापर केला जातो.

या नव्या सुविधेत 30 MeV प्रकाशकिरण (beam) वापरात आणली गेली आहे, ज्याच्या वापराने 18F (फ्लोरीन-18 आयसोटोप) तयार केले जाते.

18F हे [18F] फ्लोरोडिऑक्सिग्ल्युकोज (FDG) तयार करण्यासाठी वापरले जाते, जो की वैद्यकीय उपचारासाठीचा एक किरणोत्सर्गी पदार्थ आहे आणि तो बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी (BRIT) द्वारा वापरला जातो.

गॅलियम-68 आणि पॅलेडियम-103 आयसोटोप हे अनुक्रमे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आणि प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरतात.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: