साथी उपक्रम

वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतलेल्या “साथी” या उपक्रमाचा काल शुभारंभ झाला.

यंत्रमाग क्षेत्रात ऊर्जा सक्षम वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि अशा तंत्रज्ञानाचा वापर करतांना वीज बचत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पूर्वीच्या इलेक्ट्रिक मोटर बदलून त्या जागी ऊर्जा सक्षम अशा आयईथ्री या मोटर बसविणार आहे.

या उपक्रमामुळे पहिल्या टप्यात 10 ते 15 टक्के वीज बचत अपेक्षित आहे.

या सक्षम उपकरणांमुळे विजेबरोबरच खर्चाचीही बचत होणार आहे. इचलकरंची, भिवंडी, ईरोड, सूरत, भिलवारा आणि पानीपत येथील यंत्रमाग समूहांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: