सात राज्यांमध्ये 13 नवीन केंद्रीय विद्यालये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने सात राज्यांमध्ये 13 नवीन केंद्रीय विद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

13 नवीन केंद्रीय विद्यालये पुढीप्रमाणे -

उत्तर प्रदेश – बांदा, सीआयएसएफ सुरजपूर, मिर्जापूर, भादोही, बावली (५)

महाराष्ट्र – वाशीम आणि परभणी (२)

बिहार – नावाडा, देवकुंड (२)

झारखंड – पालामौ

तेलंगण – सिद्दीपेट

कर्नाटक – कुडामालकुंटे

मणिपूर – चकपिकारोंग

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात अलोट येथे दुसरे जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील समुदाय मोठ्या संख्येने आहे आणि तिथे अतिरिक्त जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. तसेच, राज्य सरकारनेही आवश्यक जमीन आणि विद्यालयासाठी तात्पुरती इमारत देण्याची तयारी दर्शवली होती. शेवटी या मागणीला मंजुरी मिळाली आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: