सागरमाला प्रकल्पास गोल्ड अवाॅर्ड

दिल्ली येथे आयोजित ५२ व्या स्कॉच समिट २०१८ मध्ये सागरमाला या प्रकल्पास पायाभूत संरचना या क्षेत्रात अवाॅर्ड देण्यात आला आहे.

स्कॉच अवाॅर्ड –

सामाजिक – आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व व उत्कृष्टता यांना स्कॉच अवाॅर्डने सन्मानित करण्यात येते.

सागरमाला प्रकल्प –

देशातील ७,५०० किलोमीटरची किनारपट्टी व १४,००० किलोमीटरचे अंतर्गत जलमार्ग यांचा विकासासाठी सुयोग्य वापर करण्यासाठी सागरमाला या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे मुख्य चार स्तंभ असून ते पुढीलप्रमाणे

१. बंदरांचे आधुनिकीकरण

२. पोर्ट कनेक्टिव्हिटी

३. बंदरांधारित औद्योगिकीकरण

४. किनारी भागातील समुदायांचा  विकास

सागरमाला प्रकल्पाचा उद्देश –

१. देशांतर्गत जलवाहतुकीचा वाट दुप्पट करणे.

२. वाहतूक खर्च प्रतिवर्ष ३५-४० हजार कोटींनी कमी करणे.

३. माल निर्यातीमध्ये ११० बिलियन डॉलरची वाढ घडवून आणणे.

४. १ कोटी नवीन रोजगारनिर्मिती करणे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: