सशस्त्र दल विशेषाधिकार अधिनियम-1958 (AFSPA)

सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958 (AFSPA)

सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958 (AFSPA) हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून “अशांत क्षेत्र” घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात.

‘अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम-1976’ नुसार एखाद्या क्षेत्राला “अशांत” घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी.

हा कायदा लागू केल्यास, सशस्त्र दलाला कोणत्याही सूचनेशिवाय कोणालाही कधीही कैदेत टाकण्याचे अधिकार दिले जाते आणि ते कुठेही मोहीम चालविण्यास सक्षम असते.

भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी 15 ऑगस्ट 1942 रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.

काही कालावधीपूर्वी आसाममध्ये या कायद्याचा वापर करून संपूर्ण राज्य ”अशांत क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु , ‘सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958’ (AFSPA) याच्या कलम-3 अन्वये प्राप्त अधिकाराच्या अधीन राहून आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी या कायद्याची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.

हि मुदतवाढ 28 ऑगस्ट 2018 पासून मोजण्यात येणार आहे.

आसाममध्ये ‘नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी’ (National Register of Citizens -NRC) या दस्तऐवजाला अद्ययावत केले जात आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: