सर्वोच्च न्यायालयातील आठव्या महिला न्यायाधीश

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश बनणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश म्हणून काम पाहिलेल्या महिला –

१) फातिमा बीवी

२) सुजाता वी. मनोहर

३) रूमा पाल

४) ज्ञान सुधा मिश्रा

५) राजन प्रकाश देशाई

६) आर. भानुमति

७) इंदु मल्होत्रा

सर्वोच्च न्यायालयातील तीन महिला न्यायाधीश -

न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत.

न्या. बॅनर्जी रुजू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यासह न्या. आर. भानुमती व न्या. इंदू मल्होत्रा अशा तीन महिला न्यायाधीश होतील.

न्या. भानुमती जुलै २०२० मध्ये, न्या. मल्होत्रा मार्च २०२१ मध्ये व न्या. बॅनर्जी सप्टेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होतील. म्हणजेच पुढील किमान दोन वर्षे सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची तीन ही संख्या कायम राहील.

एकूण २५ पैकी तीन हे महिला न्यायाधीशांचे प्रमाणही आजवरचे सर्वाधिक असेल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: