सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेले आमदार

सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या देशभरातील 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआर या संस्थेच्या अहवालातून ही माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे. एडीआरने देशभरातील आमदारांचं सर्वेक्षण या अहवालासाठी केले आहे.

देशात सर्वाधिक कमाई असणाऱ्या आमदारांच्या यादीत कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन. नागराजू पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 157.04 कोटी रुपये आहे.

प्रख्यात उद्योगपती आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लोढा यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे.

यादीत समाविष्ट झालेले महाराष्ट्रातील आमदार -

१. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर

२. सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल सहाव्या क्रमांकावर

३. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर 17 व्या स्थानावर

४. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विसाव्या क्रमांकावर

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: