सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक

फोर्ब्स मासिकाने एक यादी जाहीर केली आहे. या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी चेअरमन स्टिव्ह बॉलमेअर यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक ठरले आहेत.


बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मुंबई इंडियन्स या संघाची मालकी स्विकारली आहे.


तसेच गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाला मोठा आर्थिक फायदा झाला होता. ज्यामुळे रिलायन्सचे शेअर्स हे चांगले वाढले होते.


फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 199 वा क्रमांक आहे.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: