सरस्वती सन्मान- 2017

गुजराती कवी सीतांशु यशसचंद्र यांचा कवितासंग्रह “वखार” 2017 सालच्या सरस्वती सन्मानासाठी निवडण्यात आला आहे. लोकसभेचे माजी महासचिव सुभाष सी. कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड परिषदेने या सन्मानासाठी या कवितासंग्रहाची निवड केली आहे.

सीतांशु यशसचंद्र यांच्याविषयी

गुजरातच्या भुजमध्ये 1941 साली जन्मलेले सीतांशु यशसचंद्र समकालीन गुजराती साहित्याचे एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.कवी, नाटककार, अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ यशसचंद्र यांनी तीन कवितासंग्रह लिहिलेले आहेत. 2008 साली प्रसिद्ध झालेल्या “वखार” या कवितासंग्रहात व्यापक आणि अतिशय तत्काळ मानवी स्थिती समाविष्ट आहेत.

त्यांचे अन्य दोन कवितासंग्रह म्हणजे – “ओडीसेस नु हालेसु (1974)” आणि “जटायू (1986)”. त्यांच्या “जटायू” साहित्याला 1987 साली गुजरातीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना 2006 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कवितांसोबतच 10 नाटके आणि 3 टीकात्मक पुस्तके लिहिलेली आहेत.

सरस्वती सन्मान

सरस्वती सन्मान या पुरस्काराची के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे 1991 साली स्थापना केली गेली. भारतीय संविधानाच्या अनुसूची VIII मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहीलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय साहित्यकृतीच्या सन्मानार्थ भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र 15 लाख रुपये रोख आणि एक सन्मानचिन्ह दिले जाते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: