सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पूर्ण

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ बद्दल काही विशेष माहिती –

 ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.

लॉर्सन अॅन्ड टुब्रो कंपनी आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

पुतळा उभारणीसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: