‘सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया’

लेखक आर.एन.पी. सिंग यांच्या ‘सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया‘ या नावाच्या एका पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर  ‘सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया’ हे पुस्तक लिहिले गेले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल –

वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटेल समाजामध्ये त्यांच्या मामांच्या नडियाद(गुजरात) येथील घरी येथे झाला.

त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले.

सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.

त्यांच्यावर आधारित अन्य पुस्तके –

  • पोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७).
  • लोहपुरुष सरदार वल्लभबाई पटेल (मूळ इंग्रजी – लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक – विलास गिते.)
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: