संयुक्त राष्ट्रसंघ दिन- 24 ऑक्टोबर

24 ऑक्टोबर हा दिवस ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन’ (United Nations Day) म्हणून पाळला जातो. सन 1948 साली प्रथम ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन’ साजरा करण्यात आला होता.

सयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1971 साली ठराव 2782 चा अवलंब करीत 24 ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन’ म्हणून जाहीर केला. हा दिन 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाळण्यात येणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघ सप्ताह (United Nations Week) चा एक भाग आहे.

यावर्षी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत “ट्रेडिशन्स ऑफ पीस अँड नॉन वॉयलेंस” या संकल्पनेखाली कॉन्सर्ट आयोजित केले गेले.


संयुक्त राष्ट्रसंघ(United Nations)-

Image result for संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था असून मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.

24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आले. याला सुरक्षा परिषदेचे कायमचे व मूळ 5 सदस्य (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाची 51 सदस्य राष्ट्रे होती; ही संख्या आता 193 झालेली आहे.


संयुक्त राष्ट्रसंघटनेची उद्दिष्ट्ये –

1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे,

2. मानवी हक्काला प्रोत्साहन देणे,

3. सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण,

4. पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ,

5. नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अशा घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे


संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 अधिकृत भाषा –

1. अरबी

2. चीनी

3. इंग्रजी

4. फ्रेंच

5. रशियन

6. स्पॅनिश


संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ –

1. UN महासभा (General Assembly)

2. UN सुरक्षा परिषद (Security Council)

3. UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­-ECOSOC)

4. UN सचिवालय

5. UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि

6. UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: