‘सनवे एक्सास्केल कॉम्प्युटर’

‘सनवे एक्सास्केल कॉम्प्युटर -

चीनने नव्या पिढीतील महासंगणकाचे प्रारूप तयार केले आहे. संगणकाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले असून ‘सनवे एक्सास्केल कॉम्प्युटर’ असे त्याचे नाव आहे.

नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कॉम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी , दी नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर (जिनान) , नॅशनल लॅबोरेटरी फॉर मरीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थांनी संयुक्तपणे या महासंगणकाची निर्मिती केली आहे.

या संगणकाचे हे प्राथमिक रूप असून त्यात सेकंदाला क्विंटिलियन म्हणजे ( १ वर अठरा शून्य-अब्ज अब्ज) गणने करता येतात. अमेरिका व जपान हे देशदेखील एक्सास्केल महासंगणक तयार करण्याच्या स्पर्धेत असून २०२१ मध्ये त्यांचा नवीन महासंगणक तयार होईल.

भारताने ‘प्रत्युश’ हा महासंगणक पुण्याच्या IITM या हवामान प्रयोगशाळेत  बसवला असून त्याचा वेग सेकंदाला ६.८ पेंटाफ्लॉप म्हणजे १ हजार दशलक्ष-दशलक्ष गणने इतका आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: