‘सतत’ (SATAT) उपक्रमाचा शुभारंभ

भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2018 पासून नवी दिल्लीत ‘सतत’ (SATAT) उपक्रमाचा शुभारंभ करण्याची घोषणा केली आहे.

‘सतत’ (SATAT) म्हणजे ‘सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टूवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन’ होय. म्हणजेच या उपक्रमाच्या माध्यमातून दळणवळणासाठी पर्यावरणास अनुकूल अश्या पर्यायी व्यवस्था उभारण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

कम्प्रेस्ड बायो-गॅस (CBG) निर्मिती प्रकल्प उभारण्यास आणि कम्प्रेस्ड बायो-गॅस ऑटोमोटिव्ह इंधन म्हणून वापरण्यासाठी बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या ‘सतत’ उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या पुढाकाराचा बायो-गॅस बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या शेतकऱ्याला तसेच उद्योगांना फायदा होणार आहे.

कृषी-कचरा तसेच नगरपालिकेचा घन कचरा अश्या विविध प्रकारच्या जैविक माल/कचरा स्त्रोतांपासून बायो-गॅस तयार केला जाऊ शकतो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: