शबरीमाला मंदीरामध्ये महिलांनाही प्रवेश

शबरीमाला मंदीर प्रवेश प्रकरण -

केरळमधील शबरीमाला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

‘स्त्री हीसुद्धा देवाचीच निर्मिती आहे. त्यामुळे मग देवाच्याच प्रार्थनेसाठी, भक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी हा भेदभाव का? देवापुढे प्रार्थना करण्याचा समान हक्क हा पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. कायदाही याच्या आड येऊ शकत नाही’, असा निर्णय न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी दिला आहे.

चंद्रचूड हे शबरीमाला मंदीर प्रवेश प्रकरणातील याचिका सुनावणीकरता स्थापण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठातील एक सदस्य आहेत.

न्यायालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठाचं नेतृत्त्व सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केलं असून, त्यात चंद्रचूड यांच्यासोबत आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर व इंदू मल्होत्रा यांचाही सहभाग होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: