शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले

शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात१० ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने बहुमताने रद्दबातल ठरवली आहे.

शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नमूद केले आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ नरीमन, न्या. अजय खालविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी एकसमान निकाल दिला असून न्या. इंदू मल्होत्रा या एकमेव महिला न्यायाधीशांनी मात्र त्या प्रथेत हस्तक्षेप करण्याविरोधात मत दिले.

न्या. नरीमन यांच्या मते,  शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश न देण्याच्या प्रथेला किंवा संकेताला राज्यघटनेच्या कलम २५ आणि २६नुसार कुठलाही आधार नाही. महिलांना प्रवेश नाकारण्याचा रिवाज हा कलम २५ (उपकलम १) व नियम ३ (ब) या केरळ हिंदू धर्मस्थळे नियम १९६५ मधील कलमांचेही उल्लंघन करणारा आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: