व्यक्ती विशेष – व्ही.एस. नायपॉल

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक व्ही.एस. नायपॉल (वय 85) यांचे 11 ऑगस्ट रोजी निधन झाले.

विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म त्रिनिदाद येथे झाला. त्यांचे वडील सुरजप्रसाद हे त्रिनिदाद गॉर्जियनमध्ये पत्रकार होते आणि लेखकही होते. त्यांचे शिक्षण शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफोर्ड विद्यापीठात ब्रिटीश साहित्यात झाले. त्यानंतर ते लंडनमध्येच वास्तव्यास होते. नायपॉल यांनी 1955 मध्ये पेट्रीसिया एन हेल यांच्याशी विवाह केला होता. पण, त्यांचे 1996 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नादिरा अल्वी यांच्याशी विवाह केला.

नायपॉल यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान -

नायपॉल यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. नायपॉल यांचे लेखन सुरवातीला वेस्ट इंडीज केंद्रीत होते. पण, नंतर त्याला जागतिक रुप मिळाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 30 हून अधिक पुस्तके लिहिली.

द मिस्टिक मैसर‘ हे त्यांचे पहिले पुस्तक 1951 मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘ए बेंड इन द रिव्हर‘, ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास‘ , ‘इन ए फ्री स्टेट (1971)‘, ‘ए वे इन द वर्ल्ड (1994)‘, ‘हाफ ए लाईफ (2001)‘ आणि ‘मॅजिक सीड्स (2004)‘ ही महत्त्वाची आहेत.

त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे ज्यामध्ये पुढील काही मुख्य पुरस्कारांचा समावेश आहे –

* जोन लिलवेलीन रीज अवार्ड (१९५८)

* दी सोमरसेट मोगम अवार्ड (१९८०)

* दी होवथोरडन अवार्ड (1964)

* दी डबलु एच स्मिथ साहित्यिक अवार्ड (१९६८)

* बुकर अवार्ड (१९७१)

* दी डेविड कोहेन अवार्ड (१९९३)

2001 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: