व्यक्ती विशेष – मनोज झालानी

भारतीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि अभियान संचालक (NHM) मनोज झालानी यांना प्रतिष्ठित ‘संयुक्त राष्ट्रसंघ आंतर-विभागीय कृतीदल (UN Interagency Task Force -UNIATF) पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

असंसर्गजन्य रोगांच्या (NCDs) प्रतिबंध आणि नियंत्रणात आणि संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे.

27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघ आंतरविभागीय कृतीदलातर्फे (UNIATF) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नियोजित एका समारंभात संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या (UNGA) तृतीय उच्चस्तरीय बैठकीत हा पुरस्कार दिला जाणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ आंतरविभागीय कृतीदल

संयुक्त राष्ट्रसंघ आंतरविभागीय कृतीदल (UN Interagency Task Force -UNIATF) जगभरात असंसर्गजन्य रोगांच्या महामारीविरोधात प्रतिसाद देण्यासाठी उच्चस्तरीय वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकारांना पाठिंबा देण्यासाठी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटना आणि इतर आंतरसरकारी संघटनांच्या उपक्रमांशी समन्वय साधते.

ही वचनबद्धता 2011 सालच्या ‘NCDs संदर्भात राजकीय घोषणापत्र’ यामध्ये नमूद केलेली आहे. UNIATFची स्थापना जून 2013 मध्ये करण्यात आली आणि त्याची धुरा जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडे सोपवली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: