व्यक्ती विशेष – प्रशांत कुमार

प्रशांत कुमार –

प्रशांत कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (SBI ) मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. या पूर्वी त्यांनी बँकेच्या मानव संसाधन विभाग आणि गुंतवणूक विभागात महत्त्वाच्या पदावर काम पाहिले आहे.

दिल्ली विद्यापीठात विज्ञान शाखेतून पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतलेले कुमार १९८३ मध्ये बँकेत प्रमाणिकृत अधिकारी म्हणून रूजू झाले.

मानव संसाधन विभागात उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून एसबीआयच्या २ लाख ७० हजार कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण यंत्रणेची जबाबदारी त्यांच्यावर होती.

कुमार यांनी यापूर्वी एचआर विभागासह, कोलकत्ता येथे सर व्यवस्थापक आणि मुंबई विभागाचे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: