व्यक्ती विशेष – न्या. नरेश पाटील

न्या. नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे 42 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबरपासून ते पदभार सांभाळतील.

डॉ. मंजुला चेल्लूर 5 डिसेंबर 2017 रोजी निवृत्त झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींचं पद रिक्त होतं.

नरेश पाटील –

नरेश पाटील हे 13 ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहात होते.

नरेश पाटील यांनी 1979 मध्ये मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली होती. त्यानंतर फौजदारी, दिवाणी अशा अनेक प्रकारच्या खटल्यात वकिली केली. त्यानंतर पुढे त्यांनी एएसजी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडण्याचंही काम केलं.

2001 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: