व्यक्ती विशेष – न्या. गोगोई

भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांची शिफारस वर्तमान सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

कायदा मंत्रालयाने न्या. मिश्रा यांना नव्या सरन्यायाधीशांसाठी शिफारस करण्याची विनंती केली होती. या पदावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यादीत न्या. गोगोई हे सर्वात जेष्ठ आहेत.

न्या. रंजन गोगोई –

न्या. रंजन गोगोई हे 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.

त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.

एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

भारतीय सरन्यायाधीश –

भारतीय सरन्यायाधीश (किंवा भारतीय प्रधान सरन्यायाधीश -CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 145 आणि ‘सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम-1966’ अन्वये,भारतीय सरन्यायाधीश सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात.

न्या. एच. जे. कानिया (26 जानेवारी 1950-6 नोव्हेंबर 1951) हे प्रथम CJI होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: