व्यक्ती विशेष – नोव्हाक जोकोविच

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ह्याने ‘यूनायटेड स्टेट्‍स ओपन 2018‘ टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत जोकोविचने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोवर मात करून स्पर्धा जिंकली.

नोव्हाक जोकोविच

सध्या खेळत असलेल्या टेनिसपटूमध्ये तिसऱ्यांदा युएस ओपनचे विजेतेपद पटकावणारा जोकोविच सातवा खेळाडू आहे.

त्याने 2011 आणि 2015चे विजेतेपद जिंकले आहे.

जोकोविचचे त्याच्या कारकि‍र्दीतले हे 23वे ग्रँड स्लॅम जेतेपद आणि यूएस ओपनमधील आठवे जेतेपद आहे.

इतर प्रकारचे विजेता –

महिला एकेरी – नाओमी ओसाका (जपान)

पुरुष दुहेरी – माईक ब्रायन (अमेरिका) व जॅक सॉक (अमेरिका)

महिला दुहेरी – अॅशलेग बार्टी (ऑस्ट्रेलिया) व कोको वेंडेवेग (अमेरिका)

मिश्र दुहेरी – जेमी मरे (ब्रिटन) व बेथनी मॅटेक सँड्स (अमेरिका)

या सामन्यात डेल पोट्रोने 47 तर जोकोविचने 38 अनफोर्स्ड एरर केले. 2009चा युएस ओपनचा विजेता डेल पोट्रो एटीपी क्रमवारीत चौथ्या तर जोकोविच तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच राफेल नदाल पहिल्या तर रॉजर फेडरर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यूनायटेड स्टेट्‍स ओपन –

यूनायटेड स्टेट्‍स ओपन ही एक हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धा आहे.

1881 सालापासून ही स्पर्धा खेळली जात आहे आणि जगातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे.

हे एकमेव ग्रँड स्लॅम आहे, जे सामन्याच्या प्रत्येक फेरीमध्ये टायब्रेकर वापरते.

ही वर्षभारत खेळल्या जाणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: