व्यक्ती विशेष – डॉ. पूनम खेत्रपाल सिंग

डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांची जागतिक आरोग्य संघटना (WHO) दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशच्या (SEARO) प्रादेशिक संचालक पदी आणखी पाच वर्षांच्या पुढील कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

डॉ. पूनम सिंग या WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाच्या प्रादेशिक संचालक पदावर काम करणाऱ्या प्रथम महिला आणि विशेषतः भारतीय महिला आहेत.

त्यांनी या पदाचा 1 फेब्रुवारी 2014 रोजी कारभार सांभाळला होता. पाच वर्षाच्या निर्धारित कालावधीच्या समाप्तीनंतर पुढील नवा कार्यकाळ 1 फेब्रुवारी 2019 पासून सुरु होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) -

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.

7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये WHO चे मुख्यालय आहे.

WHO हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे.

ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: