व्यक्ती विशेष – गीता गोपीनाथ

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गीता गोपीनाथची नियुक्ती केली आहे.

Image result for गीता गोपीनाथ

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची जबाबदारी सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड यांच्याकडे असून ते डिसेंबरमध्ये निवृत्त झाल्यावर गीता गोपीनाथ पदभार सांभाळतील.

गीता गोपीनाथ या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादक आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या सहसंचालिका देखील आहेत.

त्यांच्याकडे अमेरिकचं नागरिकत्व असून 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. गीता गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए व दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून एम. ए. केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.

याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. रघुराम राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: