वैश्विक उपासमार निर्देशांक 2018

21% Indian children are under-weight: Global Hunger Index

वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (Global Hunger Index -GHI) नुसार असे लक्षात आले आहे की, पाच वर्षाखालील प्रत्येक 5 भारतीय लहान मुलांपैकी कमीतकमी एकाचे वजन त्याच्या ऊंचीच्या मानाने अत्यंत कमी आहे.

119 देशांसाठीच्या या निर्देशांकाच्या यादीत भारत 103 या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत तीन स्थानांची घसरण झाली आहे. तसॆच भारतातली उपासमार संबंधी पातळी “गंभीर” म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.

भारतात कुपोषित लोकांची संख्या 2000 सालच्या 18.2% वरून 2018 साली 14.8% इतकी कमी झाली आहे. तर बाल मृत्युदर निम्मा म्हणजेच 9.2% वरून 4.3% पर्यंत कमी झाला आहे आणि खुंटीत वाढ असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 54.2% वरून 38.4% वर आले आहे.

सन 2013 ते सन 2017 या काळातल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील चार निर्देशक विचारात घेण्यात आले आहेत –

१) कुपोषण (पाच वर्षांखालील मुलांसंबंधित)

२) कमी वजन (उंचीप्रमाणे कमी वजन)

३) खुंटीत वाढ (वयाप्रमाणे कमी ऊंची)

४) बाल मृत्युदर

दक्षिण सुदानमध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 28% इतके सर्वाधिक आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: