वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल पारितोषिक 2018’

शरीरविज्ञानशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या विषयामधील ‘नोबेल पारितोषिक 2018’ जेम्स पी. एलिसन(अमेरिका) आणि तासुकू होनजो (जपान) यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.

नकारात्मक प्रतिकार शक्तीच्या नियमनाला प्रतिबंधित करून कर्करोगावर शोधलेल्या त्यांच्या उपचार पद्धतीच्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नोबेल पारितोषिक –

Image result for नोबेल पारितोषिक

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

काही विशेष माहिती –

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता.

हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.

या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते.

त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.


आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये –

  • भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,
  • वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,
  • साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि
  • शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम वरील संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती नेमण्यात येते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.

मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.


पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती –

सदर व्यक्तींना त्यांच्या सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे आजपर्यंत चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारला आहे. यापैकी तीन जर्मन (हिटलरमुळे), तर चौथी व्यक्ती रशियन लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.

उत्तर व्हियेतनामच्या लु डक थो याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नोबेल नाकारले.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: