विश्व कनिष्ठ वुशू स्पर्धेत भारताला 9 पदके

ब्राझीलच्या ब्रासिलिया शहरात खेळल्या गेलेल्या 7 व्या ‘विश्व कनिष्ठ वुशू अजिंक्यपद 2018’ या स्पर्धेत भारताने एकूण 9 पदकांची कमाई केलेली आहे.

यापैकी 4 रौप्य पदकांची आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.

बबूलू, सलीम, सविता आणि रोहित यांनी शांन्शू प्रकारात रौप्य पदके तर हिमांशू, श्रुती आणि जान्हवी यांनी याच प्रकारचे कांस्यपदक मिळविली  आहेत.

वुशू-

वुशू (किंवा चीनी कुंगफू) हा मार्शल आर्टचा एक प्रकार आहे.

आंतरराष्ट्रीय वुशू महासंघ (IWF) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिडा संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाच्या स्पर्धा आयोजित करते.

याची स्थापना 3 ऑक्टोबर 1990 रोजी करण्यात आली होती व याचे मुख्यालय बीजिंग (चीन) येथे आहे.

या वुशू स्पर्धा सांडा आणि ताओलू या दोन भागांमध्ये होतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: