विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सौरभ चौधरीला सुवर्णपदक

भारतीय नेमबाज सौरभ चौधरी याने दक्षिण कोरियाच्या चाँगवान शहरात खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.

या प्रकारातील रौप्यपदक कोरियाच्या होजिन लिमने तर कांस्यपदक भारताच्या अर्जुन सिंग चीमाने पटकावले.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) –

1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.

सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: