‘विलेज रॉकस्टार’ करणार ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

भारताकडून ऑस्कर पुरस्करांच्या परदेशी भाषा श्रेणीत पाठवण्यात येणाऱ्या सिनेमाची घोषणा मुंबईत फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून करण्यात आली आहे.

2018 मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा आसामी सिनेमा ‘विलेज रॉकस्टार’ यावेळी ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

रिमा दास दिग्दर्शित ‘विलेज रॉकस्टार’ सिनेमा ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह बाबू यांनी केली.

भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी हिंदी सिनेमातून राजी, मंटो, हिचकी, पद्मावत, ऑक्टोबर, पिहू, हल्का, 102 नॉट आऊट, पॅडमॅन, अज्जी, तुम्बाद, बायोस्कोपवाला हे सिनेमे शर्यतीत होते.

याशिवाय मराठीतून न्यूड आणि गुलाब जाम, तेलुगूतून महंती, गुजरातीमध्ये रेवा आणि तामिळ, मल्याळम, कन्नडसह अनेक भाषांमधील 28 सिनेमे ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत होते, ज्यापैकी  ‘विलेज रॉकस्टार’ची निवड करण्यात आली.

भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांपैकी आतापर्यंत तीनच सिनेमांची अंतिम पाचमध्ये निवड झाली आहे. मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया (1957), सलाम बॉम्बे (1988) आणि आशुतोष गोवारीकर यांचा लगान (2001) या सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. या तीन सिनेमांचा परदेशी भाषा श्रेणीतून जगभरातून येणाऱ्या सिनेमांपैकी पाच अंतिम सिनेमांच्या सूचीमध्ये समावेश झाला होता.

परंतु, आतापर्यंत एकाही भारतीय सिनेमाचा ऑस्कर पुरस्काराने गौरव करण्यात आलेला नाही.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: