विराट कोहलीचा नवीन विक्रम

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात सुरु असलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात २४ अॉक्टोबर २०१८ रोजी भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८१ धावा काढून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

याबरोबरच त्याने सर्वात कमी डावात दहा हजार धावा पूर्ण करण्याचा सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी सचिन तेंडूलकरला २५९ डाव खेळावे लागले होते.परंतु विराट कोहलीने अवघ्या २०५ डावात दहा हजार धावा केल्या आहेत. यात त्याने ३६ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीचा सर्वोच्च स्कोर १८३ धावा आहे.

विराट कोहली हा दहा हजार धावा करणारा भारतीय फलंदाजात पाचवा खेळाडू तर जगातील १३ वा फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीच्या आधी दहा हजारांचा टप्पा आेलांडलेले भारतीय फलंदाज –

1) सचिन तेंडूलकर (१८,४२६)

2) सौरव गांगुली (११,३६३)

3) राहुल द्रविड (१०,८८९)

4) महेंद्रसिंग धोनी (१०,१२३)

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: