‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ पुरस्कार

ब्रिटीश-पाकिस्तानी लेखिका कामिला शामीसी ह्यांच्या ‘होम फायर’ या कादंबरीला ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ प्राप्त झाला आहे. विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ हा ग्रेट ब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे. कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या स्त्री लेखकाला इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची स्थापना सन 1996 मध्ये झाली होती. या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे ३०,००० पाऊंड रोख रक्कम आणि एक ब्रॉन्झ मेडल असे आहे. २०१८ साली दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी लेखिका कामिला शामीसी ह्यांची ‘होम फायर’ कादंबरी नियुक्त केली गेली आहे.

 ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: