‘लोकमान्य टिळक सन्मान – 2018’

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक सन्मान’ या वर्षी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांना जाहीर झाला आहे.

डॉ. सिवन भारतीय अवकाश शास्त्रज्ञ असून, केंद्र शासनाच्या अवकाश संशोधन विभागाचे सचिवही आहेत. भारतीय अवकाश संस्थेमध्ये होत असलेल्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे.

डॉ. सिवन यांच्या नेतृत्वाखाली एकाच प्रक्षेपकातून एकाचवेळी 104 उपग्रह इस्रोने अवकाशात सोडले होते. जागतिक स्तरावर भारतीय अवकाश संशोधनाची कीर्ती पोहोचवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि १ लाख रुपये, असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

समाज आणि राष्ट्रासाठी सेवाभावी वृत्तीने सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक देऊन गौरविले जाते.

‘लोकमान्य टिळक पारितोषिकाचे’ हे 37 वे वर्ष आहे.

2017 सालीसाठी ‘लोकमान्य टिळक सन्मान’ लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पतंजली समुहाचे प्रमुख आणि पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांना देण्यात आला होता.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: