लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि २०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात आला आहे.


पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिले जातात.

१ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे.


विकास वार्तांकनासाठी २०१६ साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर २०१७ साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, दै. सकाळ,कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: