लोकपाल शोध समिती

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय ‘लोकपाल शोध समिती’ नेमली आहे.

ही समिती भ्रष्टाचार विरोधी ‘लोकपाल’ (ombudsman Lokpal) यासाठी अध्यक्ष व सदस्य व्यक्तींची शिफारस करणार आहे.

लोकसेवकांच्या काही वर्गांविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकआयुक्त या भ्रष्टाचार विरोधी संस्था स्थापन करण्याच्या मागणीवरून 2013 साली देशाच्या संसदेत लोकपाल आणि लोकआयुक्त अधिनियम मंजूर केला गेला.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लवकरात लवकर लोकपाल नियुक्त करण्याचे आदेश दिले होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: