लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार जाहीर

उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे. अ‍ॅना बर्न्‍स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.

Image result for अॅना बर्न्स

ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदान्शी , अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान या स्पर्धकांना मागे टाकून अ‍ॅना बर्न्‍स यांनी ५० हजार पौंड किमतीचा हा पुरस्कार पटकावला आहे.

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार –

अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला. ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो.

अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्त्व देणाऱ्या या पुरस्काराची पन्नास हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक-अनुवादकांमध्ये समसमान विभागून दिली जाते .


मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आजपर्यंत केवळ पुढील ५ भारतीय लेखकांना मिळाला आहे.

१) अरविंद अडिग – २००८

२)  वी एस नाइपॉल – १९७१

३) अरुंधति राय – १९९७

४) सलमान रश्दी – १९८१

५) किरण देसाई – २००६


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: