‘लु रिव्ह्यू’ मोहीम

स्वच्छ भारत (शहरी) मोहिमेच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालयाने ‘लु रिव्ह्यू’ ही एक नवी मोहीम सुरू केली आहे.

ही मोहीम संपूर्ण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये चालविण्यात येणार आहे.

ही मोहीम चालविण्यासाठी मंत्रालयाने गूगल कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे.

गूगल कंपनीच्या ‘गूगल मॅप’ या ऑनलाइन उपयोजनावर सार्वजनिक शौचालयांचे मूल्यांकन आणि पुनरावलोकन करण्यासाठी भारतातल्या सर्व स्थानिक मार्गदर्शकांना प्रोत्साहित करण्यासाठी या मोहिमेची सुरूवात केली जात आहे.

वर्तमानात “SBM शौचालय” या नावाखाली 30,000 हून अधिक शौचालये असलेली भारतातली 500 हून अधिक शहरे ‘गूगल मॅप’वर दर्शविण्यात आलेली आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: