‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2018’

वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) संस्थेच्या ‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2018’ या अहवालात प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल सॉईल बायोडायव्हर्सिटी अॅटलस’ नुसार, भारतातली मृदा जैव विविधता गंभीर धोक्यात आहे.


WWFच्या ‘रिस्क इंडेक्स’ यामध्ये भुमीवरील विविधता, प्रदूषण आणि अधिक प्रमाणात पोषक तत्व, आक्रमक शेती करणे, शेतीला लागलेली आग, मृदेची पोषकता कमी होणे, वाळवंटीकरण आणि हवामानातले बदल या घटकांचा अभ्यास केला आहे.


ठळक बाबी -

* या नकाशावर भारतासह पाकिस्तान, चीन तसेच आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका खंडामधील बहुतेक देशांना ‘लाल रंग’ (गंभीर पातळी) दिला गेला आहे.

* भारतातल्या 50 दशलक्ष हेक्टर शेतीसाठी लागणारे परागण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 150 दशलक्ष मधमाशी वसाहतींची आवश्यकता होती. मात्र, भारतात 1.2 दशलक्ष मधमाशी वसाहती उपस्थित आहेत.

* सन 1970 ते सन 2014 या काळात मत्स, पक्षी तसेच सस्तन, उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांची संख्या 60% ने कमी झाली आहे आणि त्याच काळात ताज्या पाण्यामधील प्रजाती 83% ने कमी झाली आहे.

* 1960 सालापासून आतापर्यंत वैश्विक पर्यावरणविषयक प्रमाण 190% हून अधिक वाढले आहे. त्याच काळात पाणथळ जागेच्या प्रमाणात 87% एवढी घट झाली आहे.

* भारताचे दरडोई पर्यावरणविषयक प्रमाण प्रती व्यक्ती 1.75 हेक्टरपेक्षा कमी आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: