रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र प्रथम स्थानी

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (PMRPY) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, महाराष्ट्र ११,०६,०८७ लाभर्थ्यांसह अग्रस्थानी आहे.

२०१६-१७ मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विविध क्षेत्रांतील कंपन्या आणि सेवायोजकांना नवीन नोकरभरती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती.

मेक इन इंडिया आणि सरकारच्या अन्य योजनांसाठी पूरक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती.

या योजनेत नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार देणा-या सर्व कंपन्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह योजना आणि कर्मचारी भविष्य निधीतील योगदान (१२ टक्के किंवा अनुज्ञेय) सरकारी तिजोरीतून देण्याची ही योजना आहे. सर्व पात्र कंपन्या/सेवायोजक/नियोक्त्यांसाठी तीन वर्षे ही योजना लागू आहे.

विशेष सेवा, वस्त्रोद्योग, तयार कपडे, स्वच्छता, साफ-सफाई, इस्पितळ आणि हिऱ्यांना पैलू पाडणे, इ. जवळपास २५ क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे.

या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत महाराष्ट्र(११,०६,०८७) देशात अव्वल असून, गोवा (४९३४) शेवटच्या स्थानी आहे

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे राज्यनिहाय लाभार्थी

महाराष्ट्र ११०६०८७
तामिळनाडू ७१००८८
कर्नाटक ५६९४३३
गुजरात ५६०८५३
हरियाणा ५१२३१७
आंध्र प्रदेश ४८८८६९
उत्तर प्रदेश ४४१९४५
दिल्ली ३७११२२
राजस्थान २३३३३१
मध्यप्रदेश १८१८२५
पश्चिम बंगाल १७८३९२
उत्तराखंड १५९०९७
केरळ १०८८१३
पंजाब १०६७६६
चंदीगड ८३०७३
हिमाचल प्रदेश ७२७४०
बिहार ७२९७०
ओडिशा ६६९४७
छत्तीसगढ ५९१६४
झारखंड १९५७८
आसाम ५०८३
गोवा ४९३४

एकूण = ६११२५२७

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: