रेल्वेचा ‘राष्ट्रीय ब्लॉक’

रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी देशभरातील सर्वच विभागांमध्ये पुढचे किमान वर्षभर दर रविवारी सहा ते सात तासांचे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक पूर्वनियोजित असल्यामुळे प्रवाशांना त्याबद्दलची आवश्यक माहिती व पूर्वसूचना एसएमएस; तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातींद्वारे दिली जाईल. प्रत्येक गाडीच्या वाटचालीची नोंद करण्यासाठी रेल्वेच्या प्रणालीमध्ये जीपीएस लॉगर्सचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या मोबाइल फोनवर गाडीचा क्रमांक टाइप केल्यास त्यांना गाडी कुठवर पोहोचली आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकते. रेल्वेप्रवासात दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनाच्या वेळी मेगाब्लॉक सुरू असेल, तर प्रवाशांच्या खाण्या-पिण्याची रेल्वेच्या आयआरसीटीसीकडून व्यवस्था केली जाईल. असेल. परंतु ही सुविधा केवळ आरक्षित डब्यांतील प्रवाशांसाठीच असून अनारक्षित डब्यांतील प्रवाशांना भोजन सुविधा देण्याविषयी विचार चालू आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: