रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१८

सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना २०१८ वर्षासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोनम वांगचुक यांचे कार्य -

वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधले ९५ टक्के विद्यार्थी सरकारी परिक्षांमध्ये नापास व्हायचे.

१९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला.

या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. या प्रशिक्षणामुळे १९९६ साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण जे फक्त ५ टक्के होते ते २०१५ साली ७५ टक्के झाले.

सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

भारत वाटवानी यांचे कार्य -

भारत वाटवानी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली.

मॅगसेस पुरस्कार

आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.

फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर बंधूंनी केली.

प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.

 मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या भारतीय व्यक्ती –

अमिताभ चौधरी, अरविंद केजरीवाल (२००६), अरुण शौरी, अंशू गुप्ता (२०१५), आर.के. लक्ष्मण, इला भट्ट, कमलादेवी चटोपाध्याय, किरण बेदी, गौर किशोर घोष, चांदी प्रसाद भट्ट, चिंतामणराव देशमुख, जयप्रकाश नारायण, जॉकिन अर्पूथाम, बूबली जॉर्ज व्हर्गीस, टी.एन. शेषन, त्रिभुवनदास पटेल, दीप जोशी, प्रकाश आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, बाबा आमटे, मणिभाई देसाई, मदर तेरेसा, मंदाकिनी आमटे, मॅबल आरोळे, महाश्वेता देवी, महेशचंद्र मेहता, रजनीकांत आरोळे, रविशंकर, राजेंद्र सिंग, ललिता मिश्रा (२०११), लक्ष्मीचंद जैन, जेम्स मायकेल लिंगदोह, विनोबा भावे, शंभू मित्र, व्ही.शांताराम, शांता सिन्हा, संजीव चतुर्वेदी (२०१५), सत्यजित रे, संदीप पांडे, पी.साईनाथ, एम.एस. सुब्बलक्ष्मी, के.व्ही. सुब्बाना, प्रमोद करण सेठी, एम.एस. स्वामिनाथन, हरीश पांडे (२०११)

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: