रुपयाची ऐतिहासिक घसरण

30 ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रूपया 70.82 या नव्या नीचाकांवर पोहोचला. रुपयातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे.

29 ऑगस्ट रोजी रूपया 70.59 वर स्थिर झाला होता.

डॉलरला वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निधी काढण्याचे प्रमाण वाढल्याने ही घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने रिफायनरी कंपन्यांची डॉलरमध्ये मागणी वाढली आहे. त्याचबरोबर परकीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीमुळेही रुपया प्रभावित झाला आहे.

रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामान्य व्यक्तींवर पडणार आहे. यामुळे फ्रिज, टीव्ही, एसी आणि लॅपटॉपसारख्या ग्राहकोपयोगी आणि इलेक्टॉनिक साहित्याच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: