रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक 30 जुलैपासून सुरू झाली होती. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय 1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे.

1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या पतधोरणानुसार रिझर्व्ह बँकेने वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांचे नुकसान होऊ शकते तसेच गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.

2018-19 मधील हे तिसरे व्दिमासिक पतधोरण आहे.

यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित 6.25 टक्के केला होता. रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केल्यानंतर सध्या रेपो दर 6.50 टक्के इतका झाला आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: