रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेकडून 5 अॉक्टोबर 2018 रोजी चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसै थे ठेवण्यात आले आहेत म्हणजेच रेपो रेट 6.50 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के इतकाच राहणार आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्जाचे दरही स्थिर राहणार आहेत.

रेपो रेट –

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट –

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: