राष्ट्रीय सांख्यिकी दिन: 29 जून

देशभरात २९ जून रोजी प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांची 126 वी जयंती साजरी केली गेली. या प्रसंगी प्रा. महालनोबिस यांच्या स्मृतीत 125 रूपये मूल्य असलेले स्मारक नाणे आणि 5 रूपये मूल्य असलेले नवीन नाणे चलनात आणले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस –

29 जून 1893 रोजी प्रा. महालनोबिस यांचा जन्म कोलकाता येथे झाला.

ते त्यांच्या ‘महालनोबिस डिस्टन्स’ या सांख्यिकीय उपाय/सिद्धांतासाठी ओळखले जातात.

त्यांना 1968 साली पद्म विभूषण सन्मान दिला गेला.

त्यांनी 1931 साली कोलकातामध्ये भारतीय सांख्यिकी संस्थेची (ISI) स्थापना केली जी 1959 साली “राष्ट्रीय महत्त्व संस्था” म्हणून घोषित केली गेली होती.

ISI मध्ये 29 जून हा दिवस “कामगार दिन” म्हणून साजरा केला जातो. तसेच आता 29 जून हा दिवस राष्ट्रीय पातळीवर “सांख्यिकी दिन” म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 

29 जून 2018 रोजी भारतात  राष्ट्रीय सांख्यिकी दिन ‘क्वालिटी अश्युरंस इन ऑफिशीएल स्टॅटिस्टिक्स’ या विषयाखाली साजरा करण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: