राष्ट्रीय समुद्री शोध आणि बचाव पुरस्कार

पालघर जिल्ह्यातील सातपाटी या गावचे रहिवासी असलेले मिलन शंकर तारे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय समुद्री शोध आणि बचाव पुरस्कार दिला जाणार आहे.

५ जुलै २०१८ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या १७ व्या नॅशनल मेरीटाईम सारा बोर्डाच्या (एनएमएसआरबी) कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.

9 मे 2018 रोजी शिवनेरी नावाची मच्छिमारांची बोट पाण्यात बुडत असताना त्यांनी 12 जणांचे प्राण वाचविले होते. त्यांनी दाखवलेल्या या धाडसाचा आणि निस्वार्थ वृत्तीच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: