‘राष्ट्रीय संरचना संस्था (NID) अधिनियम-2014’

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राष्ट्रीय संरचना संस्था (National Institute of Design -NID) अधिनियम-2014’ च्या अधिकार क्षेत्रात 4 नव्या NID आणण्यासाठी त्यात दुरूस्ती करण्यासाठीचे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

कायद्यात NID अमरावती/विजयवाडा, आंध्रप्रदेश, NID भोपाळ (मध्यप्रदेश), NID जोरहाट (आसाम) आणि NID कुरूक्षेत्र (हरियाणा) यांचा समावेश आहे. या संस्थांना NID अहमदाबादप्रमाणे राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था घोषित करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहेत.

NID विजयवाडाचे नाव बदलून NID अमरावती करण्याचा प्रस्तावही दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव आहे.  त्याचबरोबरच प्रमुख रचनाकार हे पद प्राध्यापकाच्या समतुल्य करण्यासंदर्भातला प्रस्तावही विधेयकात आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: